ढेबेवाडीत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी तोडले अकलेचे तारे

आ. शंभुराज देसाई यांनीच तालुक्‍यात कोट्यवधींचा निधी आणला

सणबूर – पाटण तालुक्‍यात आ. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून विविध विकासकामांसाठी सुमारे एक हजार कोटीचा निधी आणल्याने अद्यापही विकासकामे सुरु आहेत. परंतु विकास पाहून भांबावलेल्या पदाधिकाऱ्यांनी एवढा मोठा निधी किरकोळ डागडुजीसाठी खर्च केला. अशी पत्रकबाजी करुन स्वतःची बौद्धिक क्षमता दाखवत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आकलेचे तारे तोडले असल्याचा पलटवार शंभूराज युवा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची, पुलांची, पिण्याच्या पाण्याच्या योजना यासारख्या अनेक योजनांसाठी साहेबांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तालुक्‍याचा चेहरा मोहरा बद्दलण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु एवढा मोठा झालेला विकास पाहता विरोधकांची झोप उडाली असून आता काहीतरी पत्रकबाजी केली पाहिजे. म्हणून अशी भंपक विधाने करुन प्रसिद्धीचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांना विकास पाहायचा असेल त्यांनी उघडा डोळे, बघा नीट. ढेबेवाडीच्या चौकात उभे राहून नजर फिरवली तरी विकास दिसेल. 30 वर्ष विकासाचा बॅकलॉग भरुन काढला, असे म्हणणारे 2015 पूर्वी ढेबेवाडी-जिंती प्रवास डोळे बंद करुन जात होते कि विमानाने जात होते.

2009 पासून निधी अभावी बंद असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचे कामासाठी पुन्हा साहेब आमदार होण्याची वाट पाहावी लागली. तेव्हा गप्पा मारणारे स्थानिक पदाधिकारी झोपले होते का? निवासस्थानाच्या गैरसोयीमुळे डॉक्‍टर व कर्मचारी ढेबेवाडी येथे राहत नव्हते. त्याचे निवासस्थानासाठी जवळपास 2.50 कोटीचा निधी आ. देसाई यांनी दिला. ढेबेवाडी-जिंती रस्त्यासाठी 3.40 कोटी, मराठवाडी रिंग रोडसाठी 5.19 कोटी, कंकवाडी कडववाडी बनपुरी 2.15 कोटी, गुढे-शिबेवाडी 2 कोटी, महिंद-सळवे 1 कोटी, वरची शिद्रुकवाडी 2 कोटी, कसणी-निगडे-माईगडेवाडी-सातर 4 कोटी, निवी ते कसणी 1 कोटी, जिंती-मोडकवाडी सातर 4 कोटी, महिंद धरण दुरुस्तीसाठी 75 लाख, काढणे पूल 4.66 कोटी, काढणे-शिद्रुकवाडी-खळे 4.50 कोटी याशिवाय अनेक छोटे रस्ते, साकव, सभामंडप, पिण्याच्या पाण्याच्या योजना यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी फक्त ढेबेवाडी विभागातील आहे. आणि हा तुमचे भाषेत जर दुरुस्तीसाठी असेल तर एवढा निधी किरकोळ दुरुस्तीसाठी असतो, अशी विधाने करणाऱ्याच्या बुद्धीची किव करावीशी वाटते.

पाटणकर दादाचे मंत्रीपदाचे काळातील केवळ 1 टक्के निधी विभागातील विकासकामावर खर्च केला असता तर विभागाचा कायापालट झाला असता. राजकारणाचा वापर केवळ स्वतःचे पोट भरण्यासाठी करणाऱ्यांनी टिका करताना स्वतःची उंची तपासून टीका करावी, असे अवाहन शंभूराज युवा संघटनेच्या नाना साबळे, मनोज मोहिते, रणजित पाटील, सचिन पाटील, प्रशांत घारगे, पंकज जानुगडे, धनाजी शेवाळे, राहुल शेडगे, अंकुश साळुंखे, जोतिराज काळे, सुमीत अनुते या कार्यकर्त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)