ढेकळवाडीत कृषिदुताचे आगमन

भवानीनगर- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न कृषी महाविद्यालय बारामती अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी ढेकळवाडीत कृषिदुतांचे आगमन झाले आहे. ग्रामपंचयतीच्या प्रांगणनात आयोजित स्वागत कार्यक्रमामध्ये सरपंच नानासाहेब घुले समेत अन्य ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी कृषिदुत ऋषिकेश जमादाडे, राहुल माने, सौरभ काशिद, सुजित कुलाळ, सागर नवले, सलीम कदिरी, अविनाश गुरीजेला यांचे स्वागत ग्रामस्थांनी केले.
सर्व कृषिदुत हे ढेकळवाडी गावामधे शेतीविषयक वेगवेगळी प्रत्याक्षीके घेणार आहेत. तसेच ते शेतकऱ्याना शासनाच्या विविध योजने बद्दल व आधुनिक शेती पद्धति व तंत्रज्ञान बद्दल माहिती सांगणार आहेत. यावेळी कृषिदुतांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व समजविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)