ढाबा मालकावर चाकूने वार

दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक येथील ढाबा मालकावर किरकोळ कारणावरुन चाकूने वार केल्याची घटना रविवारी (दि. 30) दुपारी घडली.
आरती ढाब्याचे मालक निवृत्ती तुकाराम पवळे (रा. काठापुर बुद्रुक) यांच्यावर वार करण्यात आले आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सनी विलास पाचपुते, मल्हारी बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची फिर्याद ढाबामालक निवृत्ती पवळे यांनी दिली आहे. मंचर-शिरुर रस्त्यावर काठापुर बुद्रुक गावच्या हद्दीत आरती ढाबा आहे. रविवारी दुपारी सनी विलास पाचपुते, मल्हारी बोराडे हे दोघजण आरती हॉटेलमध्ये आले होते. दोघांनी आम्ही जुन्या हॉटेलमध्ये बसू का असे विचारले असता ढाबामालक निवृत्ती पवळे म्हणाले की, तुम्ही नवीन हॉटेलमध्ये बसा नाही तर निघुन जा, या कारणावरुन दोघांनी चिडुन जाउन पवळे यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. त्यावेळी सनी पाचपुते याने निवृत्ती पवळे यांच्या उजव्या हाताच्या तळहातावर चाकूने वार केला. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर गायकवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)