ढाक्‍यात दुचाकीस्वारांना हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही

ढाका (बांगला देश) – ढाक्‍यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही, असा नियम लागू करण्यात आला असल्याची माहिती ढाका पोलीसांनी दिली आहे. ढाक्‍यातील पंपचालकांना तसे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात एका भरधाव जाणाऱ्या बसने दोन अल्पवयीन मुलांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लाखो संतप्त लोकांनी खराब रस्ते आणि बेशिस्त वाहतूक यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले होते. एका दुचाकीवर जास्तीत जास्त दोन व्यक्तीच बसू शकतील आणि मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरले पाहिजे अशी सक्ती करण्यात आलेली आहे.

बांगला देशातील महामार्ग हे जगातील अत्यंत धोकादायक महामार्गांपैकी आहेत. दर वर्षी बांगला देशात सुमारे 12,000 लोक रस्त्यावरील अपघातात मरण पावतात, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. गेल्या महिन्यातील ईद अल अधा सुटीच्या 13 दिवसात रस्त्यावरील 237 अपघातात 259 जण मरण पावले आणि 960 जण जखमी झाले होते.

बांगला देशात दुचाकीवर दोनपेक्षा अधिक जण बसणे आणि कोणीही हेल्मेट न वापरणे ही नित्याची गोष्ट आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)