ढमालेमळ्यात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर

File photo

ओतूर- नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूर ( ता. जुन्नर) गावाजवळील ढमाले मळा फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. वनाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून त्यास उपचार्थ माणिकडोह येथे नेण्यात आले. दरम्यान, ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
या बिबट्याच्या मागच्या दोन्हीही पायाला मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी बापू येळे यांना कळविली असता ताडतीने घटनास्थळी आले. वनरक्षक एस. ए. राठोड, एस. जी. मोमीन, वनपाल सी. ए. कांबळे, वनरक्षक पवार, गराड तसेच बिबटया रेस्क्‍यू टिमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर घटना घडल्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी खूपच गर्दी केली होती. त्यामुळे बिबट्याला उपचारासाठी बेशुध्द करुन पकडण्यासाठी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रातील डॉ. अजय देशमुख यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबट्यास बेशुद्ध करण्यासाठी दोन डॉट मारले मात्र, बघ्यांची गर्दी व आरडा ओरडा अधिक असल्याने बिबट्या बेशुद्ध झाला नाही. शेवटी स्नेहर टाकुन पिंजऱ्यात ओढुन बिबट्याला बंदिस्त करुन उपचारासाठी माणिकडोह येथे नेण्यात आले. दरम्यान, नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूर ते आळेफाटा या दरम्यान बिबट्या जखमी होणे, बिबट्याचा मृत्यू होणे हे प्रमाण खूप वाढले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)