ढगाळ हवामानामुळे भुईमूग हंगाम धोक्‍यात

चिंबळी – गेल्या पधंरा ते वीस दिवसांपूर्वी सतत पडलेल्या रिमझिम पावसाने खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला होता; परंतु गेल्या आठवड्यापासून हवामानात बद्दल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकासह वाल, मूग, उडीद, भुईमूग पिकासह किडी रोगाचा प्रादुर्भाव होऊन पानावर लहान लहान किड्यानी पोखरले आहे, त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. खेड तालुक्‍यातील कुरुळी, चिंबळी परिसरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी घेतलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि भुईमूग पिकाला हवामान बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटली असून, पिके पिवळे पडू लागले आहेत. शेतकऱ्यांना यासाठी आता महागडी औषध फवारणी करावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून खरीप हंगामातील भुईमूग पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी वर्ग कमी झाले असून, सोयाबीनचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांची पसंती आहे. थोडंफार शेतकरी वर्गानी भुईमुग पीक घेत असून त्यावर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न घटून केलेला खर्चही वसूल होतो की नाही, यांची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)