पुणे, दि. 22 – गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात जाणविणारे उन्हाचे चटके मंळवारी ढगाळ वातावरणामुळे काहीसे कमी झाले होते. पण, पावसाने मात्र हुलकावणी दिल्याने थोडी निराशा झाली.
शहरात गेले दोन दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या आसपास पोहचले होते. त्यातच मंगळवारी सकाळपासून अचानक वातावरणात बदल होत ढगाळ वातावरण निर्माण झाले. याबरोबर वारेसुद्धा वाहत होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती, पण उकाडा वाढला होता. सकाळी 9 वाजेपर्यत ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मात्र ढग दूर झाले आणि उन्हाचे चटके जाणवू लागले.त्यानंतर दुपारी पुन्हा आकाशात ढग जमा झाले होते. पण पाऊस काही पडला नाही.
मंगळवारी दिवसभर शहरात असेच वातावरण होते. या वाऱ्यामुळे मात्र तापमानात थोडी घट झाली आहे. आज शहरातील तापमान हे 37 अंशापर्यत घसरले होते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासांत शहरातील हवामान ढगाळ राहणार आहे. त्याचबराबेर कमाल तापमानही 37 ते 38 अंशांच्या आसपास राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)