ढगांची पुन्हा हुलकावणी

पिंपरी – गेल्या एक आठवड्यापासून सतत रोज आकाशात जमा होणाऱ्या ढगांना बुधवारी देखील न बरसताच पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना हुलकावणी दिली. गेल्या आठवड्यापासून सतत शहरात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान जरी कमी झाले असले तरी उकाडा आणि उष्णता प्रखरतेने जाणवत आहे.

बुधवारी सकाळपासून आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली होती. ढगांमुळे दमट वातावरण आणि उकाडा प्रचंड वाढला होता. दक्षिण भारतात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप शहरात पावसाळा सुरु होण्यास किमान एक आठवडा लागेल परंतु त्यापूर्वी होणारा मान्सूनपूर्व ही अद्याप बरसलेला नाही. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी होत चालले असल्याने सर्वांचेच लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)