ड प्रभागांतर्गत फेरीवाल्यांना मिळणार जागा

  • जागेचा ताबा मिळणार ः चिठ्ठ्या टाकून आज सोडत

पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 नुसार महापालिकेच्या ड प्रभागातील फेरीवाल्यांना आता हक्‍काची जागा मिळणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. 23 ) चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 ची पिंपरी-चिंचवड शहरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील फेरीवाल्यांचे सन 2012 मध्ये आणि उर्वरित फेरीवाल्यांचे जानेवारी 2014 मध्ये अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर पात्र-अपात्र फेरीवाल्यांची यादी निश्‍चित करण्यात आली. त्यातील पात्र फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करून त्यांना महापालिका ड प्रभाग कार्यालयाकडून फेरीवाला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 नुसार महापालिकेच्या ड प्रभागातील फेरीवाल्यांसाठी वाकड येथील पोलीस लाईनजवळ, कावेरीनगर रोडवर, राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारी तसेच राजीव गांधीनगर समोरील जागा निश्‍चित करण्यात आली आहे. शुक्रवारी या जागा क्रमाने वाटप करण्यात येणार असून कावेरीनगर रोडवरील जागेसाठी सकाळी अकरा वाजता, तर राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील जागेसाठी दुपारी तीन वाजता चिठ्ठ्या टाकून सोडत करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित फेरीवाल्यांनी औंध-रावेत रोड, रहाटणी येथील ड प्रभाग कार्यालय येथे दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन फेरीवाल्यांना करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)