ड्रोनने आता मालमत्तेचा नकाशा

देशात ड्रोन प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात नवीन नियम डिसेंबरपासून लागू होत आहेत. अशा स्थितीत रिअल इस्टेट क्षेत्र देखील हे तंत्र वापरास तयार आहे. उद्योगजगतातील तज्ज्ञांच्या मते, मालमत्तेची थ्रीडी मॅपिंग ही मालमत्तेच्या व्यवहारात पारदर्शकतेला चालना देणारे ठरू शकते. नवीन तरतुदीनुसार ड्रोनचा व्यावसायिक वापर हा एक डिसेंबरपासून वैध ठरला जाणार आहे.

अलीकडेच एका सर्व्हेक्षणानुसार मालमत्तेचे अचूक रेखांकन करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. कारण या माध्यामातून घराचा थ्रीडी नकाशा तयार करणे सोपे आहे आणि यात घराची निर्मिती आणि मजल्यांची संख्या देखील निश्‍चित करणे सोयीचे जाते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ड्रोनच्या मदतीने थ्रीडी चित्रण हे शहरातील मालमत्तेचे अधिकाधिक वास्तविक चित्रण आणि डॉक्‍युमेंटेंशनसाठी उपयुक्त ठरत आहे. यातून अधिक जबाबदार आणि पारदर्शकता आणण्यात हातभार लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– शैलेश धारकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)