ड्रेस कोडचा निर्णय मागे न घेतल्यास अध्यक्षांना चोप: तृप्ती देसाई 

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून जाणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश न देणाऱ्या निर्णयाच्या विरोधात भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतलेला हा निर्णय नवरात्रोत्सवापूर्वी मागे न घेतल्यास देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना चोपणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाईची ख्याती जगभर आहे. अंबाबाई देवीच्या दर्शनाला महाराष्ट्रातून नव्हे, तर विविध देशातून भाविक दर्शनाला येतात. नवरात्र उत्सव काळात तर भाविकांची दर्शन घेण्याची संख्या ही 25 लाखांच्यावर जाते. अंबाबाईचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घातल्यास त्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी नुकताच जाहीर केला आहे.
या निर्णयाला भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी थेट आव्हान दिले आहे. हा निर्णय नवरात्र उत्सवाच्या पूर्वी मागे न घेतल्यास समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना चोपणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एकीकडे न्यायव्यवस्था महिलांच्या बाजू निर्णय देत असताना देवस्थान समितीचे अध्यक्ष हे प्रसिद्धीसाठी महिलांवरती जाचक नियम घालण्याचा घाट घालत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)