ड्रेनेजचे काम न दिल्याने मारहाण करून मागितली खंडणी

कडाचीवाडी येथील प्रकार ः चार जणांवर गुन्हा दाखल

महाळुंगे इंगळे-ड्रेनेजचे काम न दिल्याने 50 हजारांची खंडणी, तसेच पैसे दिले नाही, तर मुळीच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत एकास शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करून सुरू असलले ड्रेनेजच्या पाईप लाईनचे काम बंद पाडल्याप्रकरणी कडाचीवाडी (ता. खेड) येथील बापदेव वस्तीवरील चार जणांवर गुरुवारी (दि. 13) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन हनुमंत कोतवाल, सत्यम दत्तात्रय कड, अक्षय सुरेश कड व महेश बबन कड (सर्व रा. बापदेव वस्ती, कडाचीवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. राजेंद्र जालिंदर काळे (वय 31, रा. सिद्धिविनायक नगर, मेदनकरवाडी, ता. खेड; मूळ रा. सारोळा, ता. जामखेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कडाचीवाडी येथील बापदेव वस्तीवर ड्रेनेजच्या पाईप लाईनचे काम सुरु होते. रविवारी (दि. 9) सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी वरील चारजण संगनमताने आले. त्यांनी राजेंद्र काळे यांच्याकडे ड्रेनेजचे काम मागितले. मात्र काळे यांनी त्यांना ते काम दिले नाही. त्यामुळे चिडलेल्या त्या चौघांनी पन्नास हजारांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही, तर मुळीच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत काळे यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने, लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण करत संबंधित ठिकाणी सुरु असलेले ड्रेनेज पाईप लाईनचे काम बंद पाडले. काळे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी सचिन कोतवाल, सत्यम कड, अक्षय कड व महेश कड या कडाचीवाडी येथील चार जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंगे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)