ड्रॅगन फळाची पुणेकरांना भुरळ

मागणी वाढली 


मार्केट यार्डात दररोज होतेय 5 ते 6 टन आवक


घाऊक बाजारात किलोस प्रतीनुसार मिळतोय 20 ते 70 रुपये भाव

 

पुणे – ड्रगन फळांची आता पुणेकरांना भुरळ पडली आहे. आरोग्यास लाभकारक असलेल्या या फळाला मागणी वाढली आहे. पेशी वाढविण्यासाठी विशेषत: ड्रॅगनचे सेवन केले जाते. त्याचबरोबर डेंग्यू, दमा, कर्करोगासह इतर आजारांवर ते गुणकारी मानले जाते. ड्रॅगनचा हंगाम सुरु होवून महिन्याचा कालावधी उलटला आहे. सध्या मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज तब्बल 5 ते 6 टन इतकी आवक होत असल्याची
माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली
विशेषत: सातारा जिल्ह्यातील फलटण, पुणे जिल्ह्यातून बारामती, नगर जिल्ह्यातील विविध भागातून या फळाची आवक होत आहे. तर, गुजरात येथूनही काही प्रमाणात आवक होते. प्रतीनुसार किलोस 20 ते 70 रुपये भाव मिळत आहे. लाल आणि पांढरे अशा दोन प्रकारची ड्रॅगन फळे आहेत. त्यातील लाल रंगाच्या ड्रॅगनला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. ड्रॅगन उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाने प्रक्रिया उद्योग सुरु करावेत अशी मागणी होत आहे. ड्रॅगन फळाला सध्या काही प्रमाणात ज्युस विक्रेते आणि आईस्क्रिम विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी मेळावे घेवून या फळावर प्रक्रिया करुन काय करता येईल यावर विचारमंथनही केले आहे
व्यापारी अरविंद मोरे म्हणाले की, ड्रगनला मुंबईसह राज्याच्या विविध भागातून आणि गोवा, गुजरात येथून जास्त मागणी आहे. मागील तीन-चार वर्षात शेतकऱ्यांचा या पिक घेण्याकडे कल वाढला आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायद होत आहे. या फळाचे उगमस्थान अमेरिका आहे. अमेरिका, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी यशस्वीरित्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. आता खास उष्णप्रदेशीय देशामध्ये
याचे उत्पादनन्‌ घेतले जाते. ड्रॅगन फ्रुटच्या फळाची चव साधारण किवी फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडीशी गोड असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या बिया असतात. त्या चविष्ट असतात.
याविषयी नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील शेतकरी सदाशिव वुलटे म्हणाले, अडीच एकरात या फळाची लागवड केली आहे. यंदाचे दुसरे वर्ष असून एकरी पाच ते सात टन उत्पादन निघते. यातून अंदाजे पाच ते सात लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्या अपेक्षेपेक्षा भाव कमी असून, लवकरच वाढतील अशी, अशा आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)