‘ड्रॅगन पॅलेस’ जागतिक वारसा झाले पाहिजे; राज्य शासन हा वारसा जपण्याचे काम करेल – मुख्यमंत्री

नागपूर: भारत व  जपान या दोन देशातील मैत्रीचा धागा दृढ करण्याचे काम येथील ‘ड्रॅगन पॅलेस’च्या रूपाने होत आहे. ड्रॅगन पॅलेसमुळे नागपूर जगाच्या नकाशावर येत आहे. ड्रॅगन पॅलेस हे स्थळ जागतिक वारसा झाले पाहिजे. राज्य शासन हा वारसा जपण्याचे काम करेल असे आश्वस्त उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात आयोजित ड्रॅगन पॅलेसच्या एकोणविसाव्या वर्धापनदिनी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, आंतरराष्ट्रीय निचीरेन-शु फेलोशिप असोसिएशन  चिबा जपान येथील प्रमुख भदन्त कानसेन मोचीदा यांसह जपान येथील भिक्षुगण उपस्थित होते.

-Ads-

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढील हजार वर्ष टिकणारे काम ड्रॅगन पॅलेसच्या रूपाने सुलेखा कुंभारे यांनी केले आहे. दरवर्षी जगभरातून लाखो लोक इथे भेट देतात. चीन, जपान, कोरिया, साउथ इस्ट एशिया या देशात भगवान बुद्धाचा विचार पोहोचला व रूजला. त्यामुळे भारताबद्दल या देशामध्ये आत्मीयता आहे. जगभरातून आलेल्या लोकांमध्ये बुद्धाच्या भूमीवर आलो ही बाब त्यांना समाधान देते.

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सोपा मार्ग भगवान बुद्धांनी दाखवला असे मुख्यमंत्री म्हणाले.  ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून बोधीसत्वाचा,पंचशीलाचा संदेश पोहचविला जातो. यावेळी त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ड्रॅगन पॅलेससाठी केलेल्या सहकार्याचाही विशेष उल्लेख  केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)