“ड्रीम गर्ल’मध्ये आयुष्मान खुरानासोबत मनजोत सिंह

आगामी चित्रपट “ड्रीम गर्ल’ची घोषणा झाल्यापासून अभिनेता आयुष्मान खुराना प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपुर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या आयुष्मानच्या विचित्र पोस्टरमुळे चित्रपट पाहण्यासाठी दर्शकांची जिज्ञासा आणखीनच वाढली आहे.

त्यातच आता “ड्रीम गर्ल’मध्ये आणखी एका कलाकाराची एंट्री झाली आहे. “फुकरे’ फ्रैंचाइजीमध्ये झळकलेला मनजोत सिंह हा चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या जीवलग मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. याबाबत मनजोत म्हणाला की, मी आयुष्मान आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्साहित आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट खूपच मजेशीर असून ती मला आवडली आहे. यापुढील प्रवासही मजेदार असेल, असे त्याने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, “अंधाधुन’ आणि “बधाई हो’ चित्रपटाच्या शानदार यशानंतर आयुष्मान खुराना आता “ड्रीम गर्ल’सोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. यात त्याच्यासोबत नुशरत भरूचा ही मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. एकता कपूरद्वारा निर्मित “ड्रीम गर्ल’चे दिग्दर्शन राज शांडिलिया करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)