ड्रायफ्रूटपासून बनवलेले ‘पौष्टिक लाडू’

डाएट फंडा

ड्रायफ्रूट हे आपल्या शरीरासाठी खरोखरच पोषक अन्नघटक आहेत. अनेक वेळा मोठ्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला यांचा चांगला उपयोग होतो. त्यातही काळे मनुके, बदाम, अंजिर, जर्दाळू, खारीक या गोष्टी तर शरीरातील ऊर्जेची, रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. यासाठीच जर ड्रायफ्रूटचे लाडू करून ठेवले आणि सकाळी एक दुधाबरोबर घेतला तर त्याचा शरीराला चांगला उपयोग होतो. शाकाहारी लोकांसाठी तर हे अत्यंत उपयुक्त आहेत. खरे तर सगळ्यांनाच याचा उपयोग होतो. सकाळी व्यायामानंतर ब्रेड-ऑम्लेट जर घ्यायचे नसेल तर हा लाडू आणि दूध परिपूर्ण आहार ठरतो.

खारकांची, काजूची, बदामांची पावडर समप्रमाणात, प्रत्येकी एक वाटी, यात पाव वाटी थोडा डिंक तळून घेऊन घालणे, एक वाटी किसलेले सुके खोबरे, दोन चमचे खसखस, हे सगळे मिश्रण साजूक तुपावर भाजून घ्यावेत, या मिश्रणात काळे मनुके, अंजिरांचे बारीक तुकडे घालून, थोडी पिठी साखर घालूृन केलेले लाडू पौष्टिक तर ठरतातच.

यात असलेल्या साजूक तुपाचे शरीराला चांगले फायदे होते. तुपामुळे त्वचा तजेलदार राहते. पचनसंस्था सॉफ्ट राहते. डोळ्यांना त्याचा चांगला उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या लाडूमध्ये सगळ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट असल्याने आपल्याला ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी जातानाही बरोबर घेऊन जाता येतात. ऑफिसमध्ये असल्यावर वडा-पावसारखे बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा असे पौष्टिक लाडू खाणे कधीही चांगले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)