ड्रायफ्रुट विक्रीच्या बहाण्याने फसवणूक करणारा अटकेत

एटीएम कार्ड व डेबीट कार्डची माहिती घेऊन दहा लोकांना लुबाडले

पुणे – ड्रायफ्रुट विक्रीच्या बहाण्याने नागरिकांच्या एटीएम कार्डची माहिती घेऊन फसवणूक करणाऱ्यास चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. शहाबुद्दीन उर्फ बबलू महमुद (रा. स्वराज्य कॉलनी, काळेवाडी, मूळ रा. बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे.

बाणेर, पाषाण, बालेवाडी, औंध परिसरामध्ये आरोपी आत्माराम ड्रायफ्रुट्‌स कंपनीच्या नावाने घरोघरी जाऊन स्वस्तात ड्रायफ्रुट विक्री करत होता. बिलाची रक्‍कम तो रोख स्वरूपात न घेता एटीएम, क्रेडीट किंवा डेबीट कार्डद्वारे घेत होता. स्किमरच्या सहाय्याने तो ग्राहकांची सर्व माहिती चोरत होता. यानंतर क्‍लोन कार्ड तयार करून त्याद्वारे दिल्ली येथील एटीएममधून पैसे काढण्यात आले होते. याप्रकरणी शंकरदत्त चरणदत्त जोशी (रा. बालेवाडी) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्यासह दहा लोकांची 3 लाख 53 हजार 200 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास करताना आरोपीस तांत्रिक तपास करून अटक करण्यात आली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्‍त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्‍त प्रसाद अक्‍कानुर, सहाय्यक पोलीस आयुक्‍त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक डॉ. नारायण पालमपल्ले, प्रेम वाघमोरे, पोलीस कर्मचारी दिगंबर पोतदार, श्रीकांत कुदळे, सचिव कांबळे, सचिन गायकवाड, विनोद मोरे, निकीप राठोड, ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या पथकाने केली.

एटीएम कार्ड वापरताना दक्षता घ्या…
ड्रायफ्रुटच्या नावाखाली एटीएम कार्डची माहिती घेऊन फसवणूक झालेल्या नागरिकांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. तसेच विविध पॉईंट ऑफ सेल, स्वॅपिंग मशीन येथे एटीएम कार्ड वापरताना योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयांनद ढोमे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)