ड्रग माफियांच्या विरोधात रिओत धडक कारवाई – तेरा ठार

रिओ द जानेरिओ – ब्राझील मधील दुसऱ्या क्रमाकांचे शहर असलेल्या रिओ द जानेरिओ या शहरात मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार करणाऱ्या माफियांचा सुळसुळाट झाला होता. त्यांच्या विरोधात पोलिस व सुरक्षा दलांनी मोठी संयुक्त कारवाई हाती घेतली असून यावेळी झालेल्या चकमकीत तेरा जण ठार झाले आहेत. शहरात ही कारवाई आणि चकमक सुरू आहे. माफियांच्या टोळीकडून झालेल्या गोळीबारात लष्कराचे दोन जवानहीं कामी आले आहेत.

या माफियांच्या विरोधात लष्कराचे तब्बल 4200 जवान मैदानात उतरले असून त्यांनी विमाने, रणगाडे यांच्यासह या लोकांच्या अड्ड्यांवर कारवाई सुरू केली आहे. रिओ शहरावर याच माफियांच्या टोळ्यांनी जवळपास कब्जा केल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे ही कारवाई गरजेची बनली होती. काल पासून सुरू झालेल्या कारवाईच्यावेळी आत्ता पर्यंत एकूण 430 किलो मादक द्रव्ये जप्त करण्यात आली आहेत.

टोळ्यांमधील गुंडांनी अनेक ठिकाणी अडथळे उभारून लष्करी जवानांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला पण जवानांनी तो मोडून काढला. नागरीकांनी या कारवाईला सहकार्य करावे असे आवाहन लष्कराने केले आहे. रिओ शहराची वस्ती एकूण सुमारे साडे पाच लाख लोकांची आहे. लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे ड्रग माफियांच्या विरोधात ही मोहीम सुरू केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)