ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल

नागठाणे – दारू पिऊन कार चालविल्याप्रकरणी खोडद (ता. सातारा) येथील दोन युवकांविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे त्यांना ड्रंक अँड ड्राईव्ह करताना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहित आनंदराव शिंगाडे (वय 24) व योगेश जयवंत शिंगाडे (वय 24,दोघे रा. खोडद, ता. सातारा) असे या युवकांचे नाव आहे.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे बोरगाव पोलीस ठाण्याचे जवान नागठाणे (ता. सातारा) येथे महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एक स्विफ्ट कार महामार्गावर अडवली. यावेळी या कारमधून दोन युवक उतरले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी चौकातच गोंधळ घालण्यास सुरवात केल्याने पोलिसांनी रोहित शिंगाडे व योगेश शिंगाडे यांना कारसह पोलीस ठाण्यात आणले. या दोघांविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ चा गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद पोलीस जवान सूर्यकांत पवार यांनी दिली असून पुढील तपास हवालदार पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)