डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले

पिंपरी – दोन तरुणांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून एक लाख रुपयांचा ऐवज चार चोरट्यांनी लुटून नेला. ही घटना काळजेवाडी रोड येथे घडली.

सूरज अनिल कांबळे (वय-21, रा. पर्वती निवास, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रो हाऊसवर शुटिंग करायचे आहे, असे सांगून फिर्यादी कांबळे आणि त्यांच्या मित्रास बोलावून घेतले. त्यानंतर काळजेवाडी व आळंदी सर्व्हिस रोड येथील मिलिटरी परिसरातील निर्जनस्थळी नेऊन त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर कांबळे आणि त्यांच्या मित्राकडील मोबाईल, कॅमेरा व रोख रक्कम असा 99 हजार 420 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. सहायक निरीक्षक गिरी याबाबत अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)