डोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-१)

सध्या ‘वाढ’ या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे, मग तो पगार असो, व्यवसायातील वाढ असो किंवा अगदी वाढदिवस. त्यातून जर तो मुलाचा पहिला वाढदिवस असेल तर उत्साहाला अधिकच उधाण येतं; जरी ती वाढ रोज थोडी थोडी झालेली असते तरी ती वाढ सेलिब्रेट करण्याचं ‘वाढदिवस’ हे एक सर्वमान्य निमित्त असतं. आता लोकसंख्येतील वाढ, एका प्रकारे ती देखील चांगलीच आहे कारण त्यावर उपभोग्य (कंझम्पशन) अवलंबून आहे, जितका जास्त त्यासाठी पैसा वेचला जातो (मुद्दाम इथं खर्च हा शब्द वापरत नाहीय) तेवढं आर्थिक बळ पुरवणाऱ्यांचं उखळ पांढरं होत असतं (उदा. बजाज फायनान्स) म्हणजे एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेस चालना मिळत राहते. काही महत्वकांक्षी महाभाग असेही असतात की ते वाढत्या खर्चाकडं बोट दाखवत बसण्यापेक्षा आपलं उत्पन्न कशाप्रकारे वाढेल याच्या शोधात असतात. असं असताना आपल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यात जर अशीच वाढ होत राहिली तर नक्कीच सोन्याहून पिवळं.

मग तो परतावा एका खास आवडीच्या कंपनीच्या शेअर्समधून आलेला असो अथवा नावडीच्या. आपण पाहिलं की मागील वर्षात निफ्टीनं केवळ ४ टक्के परतावा दिलाय परंतु योग्य-प्रकारे ट्रेडिंग करून त्यातून तब्बल १३५% परतावा २०१८ या वर्षात मिळालाय. याबाबत ३ डिसेंबरच्या लेखात उल्लेख केलेलाच होता. तांत्रिकी विश्लेषणाच्या काही प्रमापकाच्या आधारे या गोष्टी साध्य होऊ शकतात. आता पाहुयात ही पद्धत नक्की कशाप्रकारे कार्य करते. या पद्धतीमध्ये सुरुवातीची गुंतवणूक ही गुंतवणूकदाराच्या किंवा अशीलाच्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. आता हा प्रकार मुख्यत्त्वे ट्रेडिंग साठीच आखला गेल्या कारणानं जोखीम ही इतर पर्यायांपेक्षा जास्तच असते. त्यामुळं जेथे जास्त जोखीम, तेथील परतावा देखील जास्त असू शकतो. मागच्याच वर्षाचा हिशोब पाहता एका वेळेस रु. तीस हजार नुकसान सोसण्याची तयारी ठेवणाऱ्यास एका लाखावर एक लाख पस्तीस हजार रुपये फायदा देखील झालेला आहे. असो, यासाठी गुंतवणूकदाराच्या क्षमतेप्रमाणं टेलर-मेड पर्याय निवडता येऊ शकतात. जसं की यात फक्त ट्रेडिंग न करता यात गुंतवणूक करून त्या शेअर्सच्या मार्जिनवर ट्रेडिंग करणं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-२)

उदाहरणार्थ, श्री.संदीप यांनी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली व ते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असतील तर त्यातील साधारणपणे ९०% गुंतवणूक ही विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते आणि ती देखील टप्प्याटप्प्यानं. यात देखील गुंतवणूकदारास कोण-कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची याबाबतची मोकळीकता असते. व उरलेली १०% रक्कम ही निफ्टी फ्यूचरमध्ये शिस्तबद्धपणे ट्रेड करण्याकरीता वेगळी राखून ठेवली जाते. त्यामुळं ज्याप्रकारे मागील वर्षात या स्ट्रॅटेजीनं १८०० अंशांची कमाई करून दिली त्यामुळं एकूण पाच लाखांच्या पोर्टफोलिओवर संदीप यांना २७% परतावा मिळालेला असेल. जर गुंतवणूकदार हा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करीत असेल तर शक्यतो गुंतवणूक केलेले शेअर्स हे दीर्घ मुदतीसाठीच घेतले व राखले जातात परंतु जर याउलट श्री.जयदीप हे ट्रेडर असून त्यांना जोखीम पत्करायची तयारी आहे. ते रु. पाच लाख गुंतवणूक करत असतील व त्यामुळं ते लघुत्तम मुदतीच्या पर्यायात (पोझिशनल स्विंग ट्रेडिंग) जाऊ इच्छितात. त्यामुळं त्यांच्या बाबतीत जास्त भर हा केलेल्या गुंतवणुकीतून फायदा पदरात पाडून ती गुंतवणूक दुसऱ्या शेअर्समध्ये गुंतविण्यास अथवा वेळप्रसंगी थोडं नुकसान सोसून गुंतवणूक बाहेर काढून घेण्यास प्राधान्य दिलं जातं. त्यांच्यासाठी ती पाच लाखांची गुंतवणूक ही भांडवल म्हणून गृहीत धरली जाईल व वरील उदाहरणाप्रमाणं तेच १८०० अंश त्यांच्यासाठी ८१% परतावा मिळवून देतील. या स्ट्रॅटेजीबद्दल अधिक विस्तृतरित्या माहिती व आपल्या शंकांचं निरसन आपण टप्प्याटप्प्याने करून घेऊ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)