डोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-२)

डोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-१)

आजचा आपला विषय ‘वाढ’ हाच असल्यानं मूलभूत पृथक्करणाच्या आधारे (फंडामेंटल अॅनालिसिस) खालील तक्त्यात काही कंपन्या देत आहे ज्यांची निकाल जाहीर झालेल्या मागील तिमाहीतील (सप्टेंबर २०१८) नफ्यातील वाढ (YoY) लक्षणीय आहे. येथे जागेअभावी केवळ ५००० कोटी मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षा जास्त मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्याव ज्यांची तिमाहीतील नफ्यातील वाढ (YoY) ही २५ % पेक्षा जास्त आहे अशाच कंपन्या दिलेल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याव्यतिरिक्त मागील वर्षी ऑक्टोबरच्या लेखात पुस्तकी मूल्यापेक्षा कमी भावातील कंपन्या, कमी कर्ज असणाऱ्या कंपन्या व उत्तम प्रतिशेअर अर्थार्जन असलेल्या कंपन्यांची यादी दिलेलीच होती. अशा अनेक प्रकारे आप-आपल्या अभ्यासानुसार आपण कंपन्या निवडू शकतो. मेरिल लिंचचे संस्थापक एरिक लिंच यांचे पणतू व प्रसिद्ध पोर्टफोलिओ मॅनेजर मि. पीटर लिंच ह्यांचे शेअर निवडीबाबत अगदी साधे मापदंड होते. ते म्हणत डोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा. कंपन्यांचा अभ्यास करताना ते विक्रीची टक्केवारी, अर्थार्जन वृद्धी मूल्यांकन रेश्यो (PEG), उत्तम कॅश फ्लो व सरासरीपेक्षा कमी डेट टू इक्विटी रेश्यो आदी गोष्टी महत्त्वाच्या मानत.

एकूणच आज केलेल्या उहापोहातून एक गोष्ट नक्की की एकूणच, असे अनेक प्रकारचे मापदंड वापरून कितीतरी कंपन्यांचे शेअर्स अभ्यासपूर्वक निवडता येतील त्याबाबत पुन्हा कधीतरी. मात्र त्यांच्याद्वारे सुद्धा अपेक्षा एकच असेल, परताव्यातील वाढ, पटतंय ना ?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)