डोळसनाथ महाराज उत्सव कुस्ती स्पर्धेत साईनाथ रानवडे अव्वल

तळेगाव दाभाडे : पहिलवान साईनाथ रानवडे यांचा सत्कार करताना मान्यवर.
  • कुस्तीचा आखाडा : काकासाहेब पवार कुस्ती संकुलच्या कौस्तुभ डाफळे याच्यावर मात

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचा पहिलवान साईनाथ रानवडे याने काकासाहेब पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पहिलवान कौस्तुभ डाफळे याच्यावर मात करीत या स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावला.

उत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्‍य सातकर व मान्यवरांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचा पहिलवान साईनाथ रानवडे व काकासाहेब पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पहिलवान कौस्तुभ डाफळे यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये साईनाथ रानवडे याने विजयश्री खेचून आणली. त्यास प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस व आमदार बाळा भेगडे यांच्या वतीने ठेवण्यात आलेली चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.

क्रमांक दोनच्या कुस्तीत पहिलवान तुषार येवले (आढले-मावळ) व पहिलवान निलेश केदारी (हनुमान आखाडा-पुणे) यांच्यात काट्याची टक्कर झाली. अटीतटीच्या लढतीत तुषार येवले याने बाजी मारली. त्यास क्रमांक दोनची रोख रक्कम व पुणे पीपल्स बॅकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी ठेवलेली चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.
आखाड्यात तुषार येवले, निलेश केदारी, सत्पाल सोनटक्के, तुषार डिंबळे, विशाल भोईर, अमित पवळे, नागेश राक्षे, विशाल राजगे, चेतन बोडके, सचिन गायकवाड, भानुदास घारे, नागेश वाडेकर, देवीदास निंबळे, आतिश आडकर या नामांकीत मल्लांच्या कुस्त्या झाल्या.

राष्ट्रीय पदक विजेती महिला पहिलवान प्रगती गायकवाड व निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीचा उद्धव कुलथे यांच्यात काट्याची लढत झाली. निकाली कुस्तीत प्रगती गायकवाड हिने विजयश्री खेचून आणली. पंच म्हणून पहिलवान बाळासाहेब सातकर, अशोक कृष्णाजी भेगडे, शंकर भेगडे, बाळतात्या भेगडे, बाळासाहेब सरोदे, नारायण भेगडे, राजेंद्र मिरगे, शंकर कंधारे, संभाजी भेगडे, दौलत भेगडे यांनी काम पाहिले. कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल वस्ताद शंकरराव कुंभार व वस्ताद गोविंद टेकवडे यांना कुस्तीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कुस्तीचे समालोचन बाबा लिम्हण यांनी केले. उत्सव समितीचे माजी अध्यक्ष गणेश भेगडे व सुनील भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. समितीचे अध्यक्ष अजिंक्‍य सातकर, सरचिटणीस अनुप भेगडे, खजिनदार रोहित टकले, प्रसिद्धी प्रमुख विजय भेगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुस्त्यांच्या आखाड्यासाठी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)