डोर्लेवाडी लाभार्थ्यांना पंखा, खुर्च्यांचे वाटप

डोर्लेवाडी- घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील गोरगरीब गरजूवंताना 3 टक्के व 15 टक्के निधीतून बीबीटी योजनेअंतर्गत फायबर खुर्च्या व पंख्याचे वाटप करण्यात आले. तसेच पंचायत समिती सदस्य राहुल झारगड यांच्या शेष फंडातून वैदू वस्ती येथील समाज मंदिर आवारात सुशोभीकरणाचे दोन लाख 94 लाख रुपयांच्या कामाचे आणि गावातील दोन ठिकाणी 14 व्या वित्त आयोगातून भुयारी गटर योजनेचे अंदाजे 9 लाख रुपये कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे व राहुल झारगड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच बाळासाहेब सलवदे, उपसरपंच सुनीता खोत, खरेदी-विक्री संघाचे संचालक भगवान क्षीरसागर, अशोक नवले, डॉ. प्रतिभा नेवसे, ग्रामपंचायत सदस्य शहाजी दळवी, दादासाहेब दळवी, रामभाऊ कालगावकर, अश्‍विनी जाधव, राम बनकर, अलका भोपळे, संगीता मदने, साधना भोपळे, रेश्‍मा लांडगे, संदीप नाळे, संतोष नाळे, ग्रामविकास अधिकारी संजय म्हेत्रे, अविनाश काळकुटे, अजित जाधव, महादेव नेवसे, पंढरीनाथ नाळे, मनोज काळोखे ,पोलीस पाटील नवनाथ मदने आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)