डोर्लेवाडी– डोर्लेवाडी, झारगडवाडी (ता. बारामती) परिसरात रविवारी (दि. 27) रात्री झालेल्या वादळी वाऱ्यात अनेक घरांची पत्रे उडले तर भिंती जमीनदोस्त झाल्याने अनेक जणांचे संसार उघड्यावर आले आहेत.
बारामती तालुक्‍यातील झारगडवाडी, डोर्लेवाडी, सोनगांव, मेखळी, पिपळी आणि परिसरातील अनेक नागरिकांची घरे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात भुईसपाट झाली आहेत. अनेक जणांच्या जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेले असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असून गावातील तलाठी पडझड झालेल्या घराचे पंचनामा करण्याचे कामाला लागले आहेत. याचबरोबर बिकेबीएन रस्त्यावर देखील वादळी वाऱ्यात अनेक झाडे उन्मळून रस्त्यावर पडली यात कुठलीही जीवितहानी झाली नाही रस्त्यावर पडलेली झाडे बांधकाम विभागाकडून तातडीने झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला. तर डोर्लेवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर बसविण्यात आलेले सौर पॅनल वादळी वाऱ्यात खाली कोसळल्याने आरोग्य केंद्राचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)