डोर्लेवाडीत शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद

डोर्लेवाडी- डोर्लेवाडीत ग्राहक कल्याण फाउंडेशन आणि डोर्लेवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ग्राहक मेळावा झाला. राज्य कार्यकारणी कार्यवाह सतिश साकोरे, बारामती तालुका कृषी अधिकारी डी.बी.पडवळ, पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.एल.ओव्हाळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
बारामती तालुका कृषी अधिकारी डी. बी. पडवळ यांनी दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी ठिबकचा वापर करावा. शेतकऱ्यांनी कुठलेली पीक घेण्याअगोदर माती परीक्षण आणि पाणी तपासणी करणे गरजेचे आहे. एकच पीक वारंवार घेऊ नये, असा सल्ला दिला. सतिश साकोरे यांनी दिवाणी स्वरूपातील कायदेशीरबाबींवर मार्गदर्शन केले. डोर्लेवाडीचे सरपंच बाळासो सलवदे, फाऊंडेशनचे अध्यक्ष तुकाराम निंबाळकर, सतिश साकोरे, प्रवीण गव्हाणे, अस्लम तांबोळी, संतोष काकडे, प्रशांत तुपे, अमोल यादव, बापू नामदास, संदीप झगडे, संदीप बामणे, निवृत्ती नेवसे, सुभाष नाळे उपस्थित होते. प्रास्ताविक निवृत्ती नेवसे यांनी केले तर प्रवीण गव्हाणे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)