डोनॉल्ड ट्रम्प आणि पेंटॅगॉनला पाठवली विषारी पत्रे ; एकजण अटकेत

वॉशिंग्टन (अमेरिका): डोनॉल्ड ट्रम्प आणि पेंटॅगॉनला विषारी पत्रे पाठवण्यात आली आहेत. अमेरिकन गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्या नावे एक लिफाफा मिळाला आणि त्याच दिवशी पेंटॅगॉनच्या तपास केंद्रात आणखी दोन संशयास्पद लिफाफे मिळाले. या तिन्ही लिफाफ्यांत रायसीन नावाचा प्राणघातक विषारी पदार्थ असण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.मात्र लिफाफे व्हाईट हाऊसपर्यंत पोहचू दिले गेले नाहीत. या संबंधात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

विषारी लिफाफे मिळाल्याच्या घटनेला पुष्टी देत पेंटॅगॉनचे प्रवक्ता क्रिस शेरवूड यांनी सांगितले की, यामध्ये दहशतवादी कारस्थानांत वापरले जाणारे रायसिना नावचे विष वापरले गेल्याचा संशय आहे. एरंडाच्या बियांपासून तयार करण्यात येणारे हे विष अत्यंत प्राणघातक असते. ते पोटात गेले, त्याचा वास घेतला वा इंजक्‍शन दिले तर एका सेकंदापेक्षाही कमी वेळात ते प्राणघातक ठरते. सायनाईडपेक्षाही रायसिना 6,000 पट अधिक विषारी असते. अत्यंत दूरूनही यामुळे उलट्या होणे, अंतर्गत रक्तस्राव होणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, शरीराचे अवयव निष्क्रिय होणे असे परिणाम होतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)