डोनाल्ड ट्रम्प यांना राग अनावर ; आपटले टेबलावर हात 

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमधील बैठकीतून तावातावत निघून गेले. अमेरिका-मेक्सिको भिंत बांधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ५.७ अब्ज डॉलरच्या निधी वाटपास नकार दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प बैठकीतून निघून गेले, मात्र त्यांच्या या तरातरा निघून जाण्यामुळे ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षामध्ये टाळेबंदीबाबत जी काही चर्चा होणार होती ती रखडल्या गेली. टाळेबंदी उठवावी, या विनंतीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने या वेळी केला.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रचाराच्या वेळी आम्ही, अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधू असे आश्वासन त्यांनी दिले होते. भिंतीचे काम जास्ती खर्चिक आहे.मात्र या साठी निधी देण्यास मेक्सिको सरकारने नकार दिला आहे. आताच्या टाळेबंदीचा बुधवारी १९ वा दिवस असून, याधी अमेरिकेमध्ये १९९५-९६ मध्ये २१ दिवस टाळेबंदी करण्यात आली होती.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)