डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लगारपदी जावई जेर्ड कुश्नेर यांची नियुक्ती

न्यूयॉर्क – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून जावई जेर्ड कुश्नेर यांची नियुक्ती केली आहे. येत्या 20 जानेवारीला ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. जेर्ड कुश्नेर हे प्रॉपर्टी डेव्हलपर, आणि पब्लिशर आहेत. ट्रम्प यांनी कुश्नेर हे अमेरिकेच्या अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहणार असल्याची घोषणा केली.

कुश्नेर यांनी ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कुश्नेर यांच्याकडे कोणताही राजकीय अनुभव नसताना त्यांना हे पद दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुश्नेर यांचा आज वाढदिवस असून, त्यांना सासऱ्याकडून मिळालेली ही अनमोल भेटच मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)