डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये होणार भेट

मॉस्को : 12 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची सिंगापूर येथे भेट होणार आहे. मागील महिन्यात किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे मून जाए इन यांची भेट झाल्यानंतर कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांचे एकमत झाले होते. त्यानंतर कोरियांसदर्भातील विविध घडामोडींना वेग आला आहे.

उत्तर कोरियाला अमेरिकन शिष्टमंडळाने भेट दिली तर सिंगापूरलाही दोन्ही देशांच्या उच्चपदस्थ अधिकारी व नेत्यांनी भेट दिली आहे. आता उद्या रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लॅव्रोव जाणार आहेत. सर्जे कोरियन नेत्यांशी अणूकार्यक्रम आणि इतर व्दीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी मॉस्को येथे जाऊन सर्जे लॅव्रोव यांची भेट घेतली होती. आता सर्जे उत्तर कोरियाला जात असल्यामुळे उत्तर कोरियातील अणुकार्यक्रमामुळे तयार झालेला तणाव कमी करण्यासाठी मदत होईल असे सांगण्यात येत आहे. अमेरिकेने सध्या उत्तर कोरियावर आर्थिक बंधने लादली आहेत. ही बंधने मागे घेण्यासाठी उत्तर कोरियाने लवकरात लवकर आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत असे अमेरिकेचे मत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)