डोक्‍यावर ‘भार’, तरीही हेल्मेटचा स्वीकार!

आर्थिक दंडाला घाबरून पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद


सक्‍ती नसली, तरीही पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम


समुपदेशनाचा परिणाम : दररोज 5 हजार जणांवर कारवाईचे “टार्गेट’

पुणे – नववर्ष सुरू होताच हेल्मेटसक्तीच्या कारवाईचा वेग आला असून आता दररोज सुमारे पाच हजार जणांवर “नो हेल्मेट’ कारवाईचे “टार्गेट’ ठेवण्यात आले आहे.

मंगळवारीही (दि.1) कारवाई सुरू होती. दरम्यान, हेल्मेट सुरक्षावरील प्रबोधनासाठी मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या जनजागृती, समुपदेशनाचा फायदा होत असल्याचे चित्र दिसून येत असून हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता शहरात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती जाहीर करण्यात आली होती. नागरिकांनी स्वतःहून हेल्मेटचा वापर करावा, यासाठी समुपदेशनाद्वारे त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत “नो हेल्मेट’ कारवाई सुरूच आहेत. हेल्मेटसक्ती होणार असल्याने अनेकांनी हेल्मेट खरेदी केली आहे. परिणामी, इतर दिवसांच्या तुलनेत मंगळवारी शहरातील विविध मार्गांवर हेल्मेट परिधान करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. हेल्मेटचा दंड 500 रुपये एवढा असल्याने अनेकजण हेल्मेट वापरण्यास प्राधान्य देत आहेत. मंगळवारी शहरातील विविध मार्गांवर, चौकांमध्ये “नो हेल्मेट’च्या कारवाई सुरू करण्यात आली होती. तसेच, शहरातील 22 वाहतूक विभागांकडून याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने नागरिक स्वतःहून हेल्मेट परिधान करण्याचा मार्ग निवडत आहेत.

स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करणे गरजेचे असून यासाठी प्रबोधनही सुरू आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जनजागृतीचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मंगळवारी हेल्मेट परिधान करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)