इंदोरी – इंदोरी (ता. मावळ) येथील तळेगाव-चाकण रस्त्यालगत तोलानी मेरी टाइम इन्स्टिट्यूटच्या शेजारी 22 वर्षीय अनोळखी तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. शुक्रवारी (दि. 13) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
इंदोरी गावचे पोलीस पाटील जयदत्ता शिंदे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यास खुनाची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच पोलीस नाईक विठ्ठल काळे यांनी फिर्याद दिली. एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक रात्री उशिरापर्यंत कार्यरत होते; परंतु खून कोणी केला व खून झालेल्या तरुणाची ओळख पटू शकली नाही.
खुनाच्या घटनेनंतर इंदोरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, कचोळे पोलीस तपास करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा