“डोकलाम’ प्रकरणापासून भारताने धडा घ्यायला हवा

चीनकडून पुन्हा एकदा गर्भित धमकी

बिजींग – भूतानच्या सीमेजवळचा डोकलाम हा त्रिकोणी भूप्रदेश आपल्या मालकीचा असून गेल्या वर्षी निर्माण झालेल्या डोकलाम कोंडीतून भारताने धडा घ्यायला हवा, अशा शब्दात चीनने पुन्हा एकदा गर्भित धमकी दिली आहे. डोकलामच्या भागामधील स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळेच डोकलाम कोंडीची स्थिती निर्माण झाली होती, असे भारताकडून पुन्हा एकदा अधोरेखित केले गेल्यानंतर चीनने हे वक्‍तव्य केले आहे.

भारतीय राजदूत गौतम बंबावाले यांच्या वक्‍तव्यावर चीनचे विदेश मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुन्यिंग यांनी हे वक्‍तव्य केले. ऐतिहासिक कराराच्या आधारे डोकलाम हा चीनचाच भूप्रदेश आहे. तिथे उभारण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांचे काम हे पूर्णपणे चीनच्या सार्वभौम प्रदेशातील काम आहे. तेथील स्थिती बदलण्याचा काही प्रश्‍नच नाही, असे हुआ चुन्यिंग माध्यमांबरोबरच्या वार्तालापाच्या कार्यक्रमात म्हणाल्या.

“गेल्यावर्षी निर्माण झालेली कोंडी चीनच्या संयमी आणि शहाणपणामुळेच सोडवली गेली. यातून भारताने योग्य तो धडा घेतलेला असेल आणि यापुढे ऐतिहासिक कराराचा मान राखला जाईल. तसेच सीमाभागात चीन करत असलेल्या विकास कामांबाबत दोन्ही बाजूंसाठी पोषक वातावरण कायम राखले जाईल, अशी आशा आहे.’ आसेह्गी हुआ म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)