डोईफोडे यांच्यानंतर प्रशासनाचा पदभार कोणाकडे?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून तर क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने बदलीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे महापालिकेतील सर्वात प्रभावशाली पदाचा कार्यभार कोणाकडे सोपविला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी पालिका आस्थापनेवर सहाय्यक आयुक्‍त संवर्गातील एकूण 11 पदे आहेत. त्यात 6 शासन प्रतिनियुक्‍तीवरील आणि 5 महापालिकेचे अधिकारी आहेत. डोईफोडे व कापडणीस यांची बदली झाल्याने राज्य सेवेतील दोन सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त झाली आहेत. डोईफोडे 5 ऑगस्ट 2014 रोजी पिंपरी पालिकेत रूजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभागाचा पदभार होता. त्यांची 12 फेब्रुवारीला लातूर जिल्हातील उदगीर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. मात्र, या ठिकाणी ते रुजू झाले नव्हते. त्यांनी राज्य सरकारमधील एका महिला मंत्र्यांचे राजकीय वजन वापरून, नगर विकास विभागाकडून 31 मे पर्यंत पिंपरी पालिकेतील मुदत वाढवून घेतली होती. ही मुदत संपल्यानंतर 12 दिवस उलटल्यानंतरही, त्यांची अन्य ठिकाणी पदस्थापना न झाल्याने ते महापालिकेतच कार्यरत होते. अखेर त्यांची नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डोईफोडे यांच्या जागी उदगीर नगरपालिकेतून बदली होऊन आलेले नितीन कापडणीस यांची अवघ्या तीन महिन्यामध्येच नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडे क्रीडा विभाग व “ई’ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी म्हणून पदभार होता. कापडणीस यांची केवळ तीन महिन्यात बदली झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)