डोंबारी पालावर दिवाळी गोड

वाल्हे- वाल्हे गावात भटक्‍या विमुक्त समाजातील डोंबारी समाजाला राहुल यादव युवा समुहाच्या वतीने दिवाळीचा फराळ वाटप करून पालावरचीही दिवाळी गोड करण्यात आली आहे. अतिशय गरीब समाज आणि मिळेल त्यावर आपली भूक भागविणाऱ्या या समाजाला आनंदी राहावे यासाठी राहुल यादव यांनी प्रत्यक्ष पालावर जाऊन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते फराळ आणि फटाक्‍यांसह इतर वस्तूंचे वाटप केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कारंडे, सुकलवाडी संतोष पवार, सोनाली यादव, अर्चना पवार, वाल्हे पोलीस श्रीरंग निगडे, संतोष गायकवाड, प्रदीप चव्हाण, विनोद पवार, सुनील कोंढाळकर, प्रशांत दाते, अंकुश चव्हाण, रामदास पवार, संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते. डोंबारी समाज हा भटका असला तरी तो आता स्थिरावत आहे. हे स्थिरावणे कायम होऊन उघड्यावर पडलेल्या समाजाला शासनाने हातभार लावणे गरजेचे आहे. यादवांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. या समाजाला सर्वांनी मदत करावी, असे मत पोलीस निरीक्षक अकुंश माने यांनी व्यक्त केले. यावेळी राहुल यादव यांनी पैशावाला समाजाने दानशूरता दाखवून यांना मदत करावी, असे अवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)