डोंगर पोखरून उंदीर निघाला!

पिंपरी – महापालिकेच्या अंदाज पत्रकात 9 कोटींची तरतूद असताना 20 कोटीची बिले झाल्याने धन्वंतरी योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. या योजनेचे मुख्य लेखा परिक्षण विभागाने “ऑडीट’ केल्याने केवळ 95 खासगी “पॅनेल’ रुग्णालयाकडे केवळ 45 हजाराची वसुली निघाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्य लेखा परिक्षण विभागाने डोंगर पोखरुन उंदीर काढल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, कुटुंबातील व्यक्‍ती आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना धन्वंतरी स्वास्थ्य योजना 1 सप्टेंबर 2015 पासून सुरू केली. ही योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

-Ads-

धन्वंतरी योजनेमध्ये उपचार घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक यांची संख्या एप्रिल 2016 ते फेब्रुवारी 2017 अखेर 5 हजार 203 आहे. त्यावर 20 कोटी 88 लाख रुपयाची बिले पालिकेकडे आली. या योजनेसाठी गतवर्षी अर्थ संकल्पात 9 कोटीची तरतूद असताना सुमारे 21 कोटीची बिले मिळाल्याने तात्कालीन आयुक्‍त दिनेश वाघमारे यांनी वैद्यकीय विभागावर ताशेरे ओढले. तसेच, लेखा विभागानेही एवढी रक्‍कम खर्ची झाल्याने साशंकता व्यक्‍त केली.

धन्वंतरी योजनेचे “ऑडीट’ करण्यात आले. त्यातून अनेक कर्मचारी किरकोळ आजारासाठी तसेच आवश्‍यक नसतानाही धन्वंतरी पॅनेलवरील रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर कारण नसताना काही रुग्णालये रुग्णांच्या अनावश्‍यक तपासण्या करताना दिसत आहे. यामुळे योजनेमध्ये सुरळीतपणा आणणेचे दृष्टीने काही ठोस उपाय-योजना करण्याची सूचना “ऑडीट’ मध्ये आहे.

अनेक रुग्णालये पॅनेलमधून बाहेर
धन्वंतरी योजनेतून कर्मचाऱ्यांनी उपचार घेतलेल्या 3 हजार 200 बिलांची सुमारे 15 कोटी रुपयांची रक्‍कम महापालिकेने विविध रुग्णालयांना अदा केलेली नाही. बिले थकवल्याने दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, मेडी लाईफ रुग्णालय, सह्याद्रि रुग्णालय, चैतन्य रुग्णालय आणि वात्सल्य रुग्णालय या योजनेतून बाहेर पडली. बाहेर पडूनही अद्याप त्यांना बिले मिळाली नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)