डोंगरदऱ्यातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली!

“बेटी बचाओ’चाही संदेश : लायन्स सायकल बॅंकेचे उद्‌घाटन उत्साहात

वडगाव मावळ – दुर्गम आणि आदिवासी पाढ्यात वास्तव्यास असलेल्या गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना “लायन्स सायकल बॅंक संकल्पना’ पुढे आली आहे. रानवाटेने येणाऱ्या सायकलींवर “बेटी बचाओ’ हा संदेश घेऊन सायकलवर प्रवास सुरू झाला आहे. ग्रामीण भागात वेग घेतलेल्या या उपक्रमाचा शिक्षणाची चाके आणखी वेगाने फिरणार आहे.

लायन्स क्‍लब ऑफ पुणे अग्रसेन आणि लायन्स क्‍लब ऑफ वडगाव यांच्या लायन्स सायकल बॅंकेचे शुभारंभ आमदार संजय भेगडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी लायन्स क्‍लब ऑफ पुणे अग्रसेनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, प्रकल्प प्रमुखपदी लायन्स क्‍लब ऑफ वडगावचे अध्यक्ष सुनीत कदम, विशेष अतिथी म्हणून लायन्स क्‍लबचे प्रांतपाल जितेंद्र मेहता आदी उपस्थित होते.

मावळ पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, लायन्स क्‍लबचे कॅबिनेट अधिकारी विजय सारडा, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, अग्रवाल समाज लोणावळाचे अध्यक्ष राजीव अग्रवाल, लायन्स क्‍लब ऑफ पुणे 21 सेंच्युरीचे अध्यक्ष शमा गोयल, लायन्स क्‍लब ऑफ वडगावचे संस्थापक-अध्यक्ष ऍड. दामोदर भंडारी, ऍड. राजेंद्र अगरवाल, विस्तार अधिकारी रमजान मोमीन, मावळ तालुका मूल्यवर्धन प्रमुख मनिषा कारंडे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित संपन्न झाला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून “बेटी बचाओ’ हा संदेश घेऊन सायकलवर प्रवास सुरू असलेले सायकल मॅन असलेले बिहार येथील जावेद मोहम्मद तसेच सरस्वती गोयल, सुभाष गोयल, शिला अग्रवाल, राजन अग्रवाल, शशी अग्रवाल, द्वारकाजी बन्सल, उमेश अग्रवाल, मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते. लायन्स सायकल बॅंकेचे उद्‌घाटक आमदार संजय भेगडे यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला शुभेच्छा देऊन लायन्सच्या कार्याबाबत समाधान व्यक्‍त केले. जितेंद्र मेहता यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्‍लब प्रांतात करत असलेल्या कार्याची माहिती दिली आणि या प्रकल्पाला अधिक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

लायन्स क्‍लब ऑफ वडगावचे सचिव जितेंद्र रावल, खजिनदार अमोल मुथा, प्रदीप बाफना, संजय भंडारी, बाळासाहेब बोरावके, संतोष चेट्‌टी, झुंबरलाल कर्णावट, ऍड. चंद्रकांत रावल, नंदकिशोर गाडे, भूषण मुथा, आदिनाथ ढमाले, दिलीप मुथा, अंकित बाफना, योगेश भंडारी आदींनी संयोजन केले. प्रास्ताविक ऍड. दामोदर भंडारी यांनी केले. स्वागत लायन्स क्‍लब ऑफ वडगावचे अध्यक्ष सुनीत कदम यांनी केले. सूत्रसंचालन भूषण मुथा यांनी केले. गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांनी केले.

लायन्स सायकल बॅंक संकल्पना…
पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयरे आणि श्रीराम विद्यालय, नवलाख उंब्रे येथे प्रत्येकी 10 नवीन सायकली देण्यात आल्या. शाळेमार्फत गरजू तसेच लांब पल्ल्याहून शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर सायकली मोफत वापरावयास मिळणार आहेत. आणि वर्ष संपल्यावर विद्यार्थ्यांनी या सायकली पुन्हा शाळेतच जमा करावयाच्या आहेत. त्यावरून दुसऱ्या गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल, अशी लायन्स सायकल बॅंकेची संकल्पना आहे

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)