डोंगरची काळी मैना झाली महाग

मंचर (ता. आंबेगाव): आदिवासी डोंगरी भागातून डोंगरची काळी मैना (करवंदे) विक्रीसाठी आदिवासी बांधव बाजारपेठेत दाखल झाले आहे.

मंचर- उन्हाळी हंगामात रानावनात येणाऱ्या फळाची मेजवानी काही औरच असते. आंबट आंबोळी व जाळीमध्ये पिकणाऱ्या करवंदाची गोडी चाकण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत हा रानमेवा खाण्याची मज्जा वेगळीच असते. अशी उन्हाळी हंगामात येणारी काळी करवंद अर्थात डोंगराची काळी मैना मंचरच्या बाजारात दाखल झाली असून सध्या 100 रुपये किलो दराने ती विक्री होत आहे. तर छोटे माप दहा रुपये अशा पद्धतीने करवंदांची विक्री होत आहे.
डोंगरची काळी मैना (करवंदे) श्रीक्षेत्र भीमाशंकर, आहुपे, माळशेज घाट, मुरबाड येथून अनेक आदिवासी बांधव विक्रीसाठी मंचर बाजारपेठेत येत आहे. सावर्णे येथील तरुण रामजी अस्वले म्हणाले एप्रिलच्या शेवटचा आठवडा आणि मे महिना करवंदे विक्रीसाठी योग्य आहे. पाऊस झाल्यावर करवंदे विक्रीला उठाव नसतो. यावर्षी उत्पादन जेमतेम होते. अतिउष्णतेमुळे करवंद उत्पादनावर परिणाम झाल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. सुट्टीच्या काळात करवंदे विकून वह्या-पुस्तके, शैक्षणिक खर्चासाठी दीड महिना करवंदे विक्रीतून चांगले अर्थार्जन मिळत असल्याचे भीमाशंकर परिसरातील विद्यार्थी रामदास लोहकरेने सांगितले. करवंदाच्या पाट्या विक्रीसाठी एकत्र एखाद्या वाहनातून येतात. त्या माध्यमातून सर्वांना वाहतूक भाडे कमी लागून खर्चात बचत होते, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)