डोंगरकड्यावरील वनस्पतींचे जीवन आव्हानात्मक

डॉ. मंदार दातार यांचे मत; मराठी विज्ञान परिषद, फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे विज्ञानगप्पा
पुणे,दि.12- सह्याद्रीमधील डोंगरकड्यांवर उगवणाऱ्या वनस्पती या गुरुत्वाकर्षण आणि आणि प्रतिकूल वातावरणाच्या छायेत असतात. तेथे त्यांना पसरण्यासाठी आणि मुळे रुजण्यासाठी जागा नसल्याने, तसेच त्यांना आवश्‍यक अन्न उपलब्ध होत नसल्याने या डोंगरकड्यातील वनस्पतींचे जीवन आव्हानात्मक आहे,” असे मत आघारकर संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डॉ. मंदार दातार यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानगप्पामध्ये ‘सह्याद्रीमधील उभ्या कड्यांवर उगवणा-या वनस्पती’ या विषयावर डॉ. दातार बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयात रंगलेल्या या विज्ञानगप्पावेळी संयोजक डॉ. विद्याधर बोरकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., सहकार्यवाह संजय मालती कमलाकर यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी, विद्यार्थी व विज्ञानप्रेमी उपस्थित होते.
डॉ. दातार म्हणाले, “सह्याद्रीमध्ये प्रामुख्याने लीजस, फ्रिशर्स, क्रॅक्‍स, केव्ह्ज, ओव्हरहॅंग्ज इत्यादी प्रकारच्या वनस्पतीआढळून येतात. याठिकाणी मोठे वृक्ष अथवा झुडुपे फारसे पाहायला मिळत नाही. तेथे त्यांना पोषक वातावरण नसते. ट्रायपोगॉन, कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा, युट्रीक्‍लुरिया, पानतेरडा, ऑर्किड्‌स, बिगोनिया यांसारख्या वनस्पती सह्याद्रीमध्ये वर्षभर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतात. कमीत कमी जागेमध्ये या वनस्पती वाढण्याचा प्रयत्न करत असतात. यात कंद असणाऱ्या वनस्पती स्वतःचे अस्तित्व जास्त काळ ठिकवून ठेवू शकतात.
“या वनस्पतींच्या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजासहजी पोहचू शकत नाही. त्यामुळे अनुकूल परिस्थितीमध्ये या वनस्पती वाढत असतात. तसेच निरनिराळ्या वनस्पतींचा अधिवास निरनिराळा असतो. अधिवासाला साजेशी त्या त्या वनस्पतींची शरीररचना असते असेही त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)