डॉ. होमी भाभा दवाखाना ‘घाणी’च्या विळख्यात

प्रवेशद्वाराची दुरवस्था : तरुणाच्या मद्यपानाचा झालाय अड्डा

शिवाजीनगर – महानगरपालिकेकडून स्वच्छ पुण्याच्या वलग्ना करण्यात येत असतात. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. पुण्यातील सार्वजनिक दवाखान्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. वडारवस्ती, गोखलेनगर, जनवाडी या भागातील नागरिकांना जवळ असणारा डॉ. होमी जे भाभा दवाखाना व प्रसूतीगृह यांची दुरवस्था झालेली आहे.

या दवाखान्यात प्रवेश करताना प्रवेशद्वार नीट उघडत नाही. लोखंडी प्रवेशद्वाराने गंज पकडलेला आहे. प्रवेशद्वार नसल्यामुळे भटकी कुत्री, मांजरे आत प्रवेश करून घाण करत आहेत. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे, त्या संदर्भात नागरिकांना विचारले असता ते म्हणाले की, एका व्यक्‍तीवर कामाचा भार जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.

दवाखान्याच्या शेजारी दोन्ही बाजूला झोपडपट्टी असल्याने तरुण मुले सुरक्षा भिंत आणि तुटलेल्या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश करतात. त्याचबरोबर मद्यपान करतात. दवाखान्यातील कर्मचारी सांगायला गेली की, त्यांना दमदाटी करण्यात येत आहे. पालिका प्रशासनकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

दवाखान्याला शेजारी वडारवस्तीची भिंत असल्याने राहणारे लोक घरातील कचरा दवाखान्याच्या मागच्या बाजूला टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील कित्येक वर्षे दवाखान्याचे नूतनीकरण झालेले नाही. दवाखान्याच्या मागच्या बाजूस भिंतीमध्ये झाडे उगवली आहेत.

 

या भागात मोठ्या झोपडपट्टी धारक लोक राहतात. अनेक आरोग्याच्या समस्या याठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना असतात. दवाखान्यात वडारवस्ती, गोखलेनगर, जनवडी भागातील गरीब, कष्टकरी, घरकाम करणाऱ्या महिला येत असतात. नागरिकांना अनेक वेळा कचऱ्याचा त्रास होत आहे. दवाखाना म्हणजे स्वच्छता महत्त्वाची असते. मात्र, याच्याकडे प्रशासन डोळेझाकपणा करता आहेत. नूतनीकरणाचे काम मागील सताधारी पक्षाने केले होते. त्यांनतर काहीच बदल याठिकाणी झाला नाही. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा याठिकाणी मोठे आंदोलन करण्यात येईल.
– उदय महाले, माजी नगरसेवक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)