डॉ. हेगडेवार स्केटींग मैदान 5 महिन्यांपासून बंद

पिंपरी – मासुळकर कॉलनी येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार स्केटींग मैदान दुरुस्तीच्या नावाखाली मागच्या 5 महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. तसेच या मैदानाची दुरस्ती करण्यात आली असली तरी अनेक कामे आजही बाकी असून नव्याने तयार करण्यात आलेल्या या मैदानावर अनेक सुविधांची वानवा दिसून आली. तसेच या मैदानावर व परिसरात सर्वत्र अस्वच्छता दिसून आली.

महापालिकेने मासुळकर कॉलनी येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार स्केटींग मैदानाची निर्मिती केली आहे. शहरात मोजकीच स्केटींग मैदान असल्याने मासुळकर कॉलनीसह, महेशनगर, संत तुकारामनगर, अजमेरा कॉलनी, मोरवाडी, खराळवाडी, एच. ए. कॉलनी, वल्लभनगर, कासारवाडी, भोसरी आदी भागातील खेळाडू याठिकाणी मोठ्‌या प्रमाणावर सरावासाठी येत असतात. मैदानावर नवीन आच्छादन बसवण्यासाठी हे मैदान 5 महिन्यांपासून बंद ठेवले आहे. मैदानावरत आच्छादन पत्रे बसवून झाले आहे. मात्र, दुरुस्तीची कामे अपुर्ण आहेत. हे मैदान लवकरात लवकर खुले करण्याची मागणी खेळाडूंकडून होत आहे. या मैदानावर अनेक सुविधांची वानवा आहे. मैदानासाठी स्वतंत्र वाहनतळाची सोय नाही. त्यामुळे येथे बेशिस्तपणे आपली वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे वाहनांची कोंडी होते तसेच पादचाऱ्यांना अडथळा होत आहे.

या मैदानाभोवती मातीचे ढीग पडलेले असून तुटलेल्या फरश्‍या, लोखंडी मोडलेले दरवाजे तसेच निरुपयोगी साहित्यही अनेक दिवसांपासून मैदान परिसरात पडून आहे. तसेच या मैदानालगत उद्यान आहे. त्यासाठी दुसरे छोटे प्रवेशद्वार सतत खुले ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक स्थानिक नागरिक या मैदानावरुनच ये-जा करत असतात. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर आहे. मैदानावर खेळाडूंसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. सुरक्षा रक्षकांसाठी देखील खोली बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना उन्हा-तान्हात, भर पावसात काम करावे लागत आहे. मैदानाकडे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार खेळाडूंनी केली.

खेळाडूंच्या मागण्या
– मैदानावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी
– खेळाडूंसाठी अद्यावत सुविधा द्याव्यात
– मैदान व परिसराची नियमीत स्वच्छता करावी
– मैदानाबाहेर स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी
– मैदानासाठी ग्राऊंडसमन नेमावा
– मैदान लवकरात लवकर खुले करावे
– स्केटींगसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करावी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)