डॉ. सुनील साठे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

कामशेत – चिखलसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक रेव्ह. डॉ. सुनील साठे यांना महनेदान फेलोशिप चर्च, देहूरोड या चर्चचे पास्टर विकास जावळे यांच्याकडून शिक्षण व सामाजिक क्षेत्रात प्रभावी, उल्लेखनीय तसेच समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल चर्चतर्फे रेव्ह. डॉ. सुनील साठे यांना शाल, स्मृतीचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

तसेच त्यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यात आली. रेव्ह. डॉ.सुनील साठे यांनी चर्चने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन केलेल्या सन्मानाबद्दल चर्चचे पास्टर विकास जावळे व चर्च कमिटी यांचे आभार मानले. या वेळी रेणुका जावळे, रंजना साठे, सिद्धार्थ जावळे, सुहास जावळे, शिल्पा वाघमारे, भाऊ वाघमारे, सुपेकर सिस्टर आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)