डॉ. सालिम अली अभयारण्य संरक्षणासाठी लोकचळवळ उपयुक्‍त

उपनवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांचे मत : तांत्रिक सहकार्य करणार

पुणे – विविध स्थलांतरित पक्षांचा अधिवास असलेल्या डॉ. सालिम अली अभयारण्याच्या जागेचा मालकी हक्काचा वाद सुरू असल्याने, ही जागा वनविभागाने ताब्यात घेणे सध्या तरी शक्‍य नाही. याऐवजी लोकचळवळीतून त्या जागेचे संवर्धन आणि संरक्षण होणे जास्त उपयुक्त ठरेल. संवर्धनाच्या कामात शक्‍य ते तांत्रिक सहकार्य करण्यास वनविभाग नेहमीच तयार असल्याचे, उपनवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांनी स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येरवडा येथे मुळा-मुठा नदीकिनारी असलेल्या हरित पट्ट्यातील प्रदेश हा डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य म्हणून ओळखला जातो. सुमारे 22 एकरांवरील या अभयारण्यात शेकडो वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचा हा नैसर्गिक अधिवास आहे. शिक्रा, पोपट, भारद्वाज, राखी धनेश, सातभाई, गायबगळा, पाणकेंबडी, खंड्या असे देशी आणि युरेशियन स्पुनबिल, कॉमन टील, नॉर्थन पिनटेल, गडवाल अशा विदेशी पक्ष्यांचे हे आश्रयस्थान आहे. काही वर्षांपूर्वी हे अभयारण्य वनविभागाच्या अखत्यारित होते. मात्र, जागेच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादामुळे या अभयारण्याकडे सध्या दुर्लक्ष होत आहे.

येथील नदीत मोठ्या प्रमाणात प्रक्रियाविरहित मैलापाणी सोडण्याल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच विविध विकासकामांसठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, “डंपिग ग्राऊंड’ यामुळे या परिसराची “अभयारण्य’ ही ओळख पुसली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच अभयारण्यातून कल्याणीनगर ते गुंजन टॉकिज असा रस्ता तयार करण्यासाठी 592 झाडांचा बळी देण्यात आलेला असून नियोजित प्रकल्पांसाठी आणखी शेकडो झाडे तोडली जाणार असल्याने लाखो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या विदेशी पक्षांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये वनविभागाने ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी अभयारण्याचे संवर्धन करावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, अभयारण्याची जागा ताब्यात घेणे प्रत्यक्षात शक्‍य नाही. तसेच मनुष्यबळाच्या अभावामुळे येथे संवर्धन कार्य अवघड होत असल्याने, स्थानिकांनीच लोकचळवळ उभारून या अभयारण्याचे संवर्धन करणे अधिक प्रभावी ठरेल, असे श्रीलक्ष्मी म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)