डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार सुमीत राघवन

रुपेरी पडद्यावर आव्हानात्मक, प्रभावी आणि तितक्‍याच लक्षवेधी व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता सुमित राघवन आता लवकरच एका महत्त्वाकांक्षी अभिनेत्याच्या रुपात आपल्या समोर येणार आहे. सुमित आपल्या अभिनयाने नटसम्राट ठरलेल्या डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार आहे. त्याने याविषयीची माहिती एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. एवढ्या मोठ्या माणसाचे जीवन साकारणे म्हणजे तारेवरची कसरत होती. डॉ.लागूंचे आशीर्वाद शूटींगच्या आधी मिळाले हे माझे भाग्यच म्हटले पाहिजे. प्रचंड उत्सुकता आणि तितकीच धाकधूक होते आहे.. कुठेही उथळ किंवा त्यांची नक्कल माझ्याकडून होता कामा नये याची पूर्ण दक्षता बाळगली आहे., असे सुमीतने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या इतक्‍या मोठ्या कलाकाराची व्यक्तीरेखा साकारण्याचं हे शिवधनुष्य आता सुमीत पेलू शकणार का हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. त्याचे हे रुप ‘आणि.डॉ. काशिनाथ घाणेकर’ या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोटेक्‍टमधून पाहता येणार आहे. 7 नोव्हेंबर 2018ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)