डॉ.विश्‍वनाथ कराड  यांचा आळंदीकरांनी केला  नागरी सत्कार

पुणे : श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या तीरावर घाटाची निर्मिती केली व १४५ फूटाच्या गरूड स्तंभ आणि भागवत धर्माची पताका उभारल्यामुळे आळंदीच्या वैभवात भर पाडल्याबद्दल विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ कराड  व त्यांच्या पत्नी सौ.उर्मिला कराड यांचा आळंदी नगरपालिका आणि आळंदीकरांच्या वतीने नगराध्यक्षा वैजंता अशोक उमरगेकर व नगरपालिकेचे सर्व सदस्य यांच्या हस्ते  विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्यावेळी पुणेरी पगडी परिधान करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री.बबनराव पाचपुते, ह.भ.प.श्री.डॉ. तुकारामबुवा गरूड (ठाकुरबुवा) दैठणेकर, श्री. बाळासाहेब रावडे, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, पं.उद्धवबापू आपेगावकर , अशोक उमरगेकर, आळंदी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)