डॉ. विपीन शर्मा यांनी स्वीकारला पदभार

पुणे  – महापालिकेतील रिक्त तिसऱ्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी रात्री सायंकाळी स्वीकारला. सोमवारपासून ते पूर्ण वेळ कामकाज सांभाळणार आहेत. मात्र, अजून त्यांच्याकडे कोणत्या विभागांचे कामकाज असेल,याबाबत कोणताही निर्णय झालेला नसला, तरी त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (ईस्टेट) हे पद असणार आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्‍तपदाच्या तीन जागा आहेत. त्यातील दोन जागांवर मागील वर्षी राज्यशासनाने अतिरिक्त आयुक्त शितल उगले आणि राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती केली असून तिसरी जागा रिक्त होती.

ही जागा महापालिकेतील अधिकाऱ्यांना बढतीने दिली जाणार होती. त्याला राज्य शासनाने 2012 मध्ये मान्यता दिला होती. त्यानंतर पालिकेने 2016 मध्ये याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास पाठविला होता. मात्र, शासनाकडून अजून त्याबाबत निर्णय झालेला नसताना शासनाने अचानक गुरूवारी रात्री उशिरा आदेश काढून अतिरिक्त आयुक्‍तपदी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती केली

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)