डॉ. विकास आमटे यांना कृतज्ञता सन्मान जाहीर

पुलोत्सवात पुरस्कांराचे होणार वितरण

पुणे – दरवर्षी पुलंच्या नावाने दिला जाणारा कृतज्ञता सन्मान डॉ.विकास आमटे, तरुणाई सन्मान कौशिकी चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे. ग्लोबल पुलोत्सवनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत “आशय सांस्कृतिकचे’ विरेंद्र चित्राव यांनी घोषणा केली. यावेळी आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, स्क्‍वेअर 1 चे नयनीश देशपांडे, मयुर वैद्य, पिनॅकल ग्रुपचे सी.एम.डी. गजेंद्र पवार, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहीनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, स्टोरी टेलचे प्रसाद मिराजदार उपस्थित होते.

पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर, अर्काइव्ह थिएटर आणि मसाप सभागृह येथे 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान “ग्लोबल पुलोत्सव’ आयोजित केला आहे. “सबकुछ पु.ल.’ ही या वर्षीची संकल्पना असून चित्रपट महोत्सव, चर्चा, परिसंवाद, संगीत मैफल, नाटक आदी कार्यक्रम महोत्सवात होणार आहेत. यासाठी 16 कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली असून 100 कलाकार यात सहभागी होणार आहेत. पुलोत्सवातील 30 कार्यक्रम रसिकांना विनामूल्य पाहाता येतील; तर काही कार्यक्रमांना शुल्क आहे, असे विरेंद्र चित्राव यांनी सांगितले.

या महोत्सवाचा शुभारंभ 8 नोव्हेंबर रोजी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी पुलोत्सवाच्या लोगोचे अनावरण महापौर मुक्ता टिळक, पुलोत्सवावर आधारित लघुपटाचा मुहुर्त ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात 92 व्या अ.भा.सा.संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार होणार आहे. पुलंच्या दुर्मिळ भाषणांवर आधारित “वक्ता दशसहस्त्रेषु’ या लघुपटाचा प्रिमियर पुणेकरांना यावेळी पाहायला मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)