डॉ. लक्ष्मण कार्ले यांना राष्ट्रीय आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मानीत

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील डॉ. लक्ष्मण बापूराव कार्ले यांना गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे सोमवारी (दि. 26) रोजी राष्ट्रीय आरोग्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समितीच्या गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे आयोजित केलेल्या आंतरभारतीय लोककला साहित्य संमेलन 2018 च्या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. लक्ष्मण कार्ले यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे माजी कुलगुरू व एमआयटी विश्‍वशांती केंद्राचे समन्वयक डॉ. एस. एन. पठाण यांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी संमेलनाध्यक्ष राजे समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अनिता पाटील, महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कला अध्यक्ष शेख जाकीर हुसेन, उमाजी बिसेन, डॉ. लताश्री वडनेरे आदी उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्‍यातील पांढरी गावात अतिशय गरीब कुटुंबात 4 मे 1950 साली जन्म झाला. अतिशय हलाकीच्या परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हापासून गरिबांच्या मदतीला जाण्याचा संकल्प केला.

डॉ. कार्ले यांनी शासकीय वैद्यकीय क्षेत्रात 1978 साली सुरुवात केली. 30 वर्षे सलग सेवा करुन सेवानिवृत्त झाले. त्यानंतर प्रवरा (अहमदनगर) वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवा करुन सध्या तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या वैद्यकीय कार्यात ते गरीब, गरजू व वंचितांना विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचे कार्य करतात. आजारी रुग्णांना मायेच्या आधाराबरोबरच आर्थिक मदत करत असल्याने अनेक रुग्ण त्यांना शोधत असतात. त्यांच्या होतकरू स्वभावाने त्यांची परिसरात ओळख निर्माण होते. ज्यांच्याकडे वैद्यकीय उपचारासाठी पैसे नाहीत ते रुग्ण डॉ. कार्ल यांना शोधतात. अनाथ रुग्ण तर त्यांना सोडूनच जात नाहीत त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या हाताला काम मिळवू देतात.

पूर, भूकंप, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, आदी नैसर्गिक आपत्तीच्या काळात तत्पर सेवा केली आहे. वयाची 68 वर्ष पूर्ण झाले तरी उत्साह तरुणासारखा आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ. कार्ले यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व अन्य अशा 22 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.

या वेळी डॉ. कार्ले म्हणाले की, सलग करत असलेल्या वैद्यकीय कार्याची दखल घेऊन कौतुकाची थाप दिल्याने सामाजिक कार्य करण्याची उर्मी वाढली आहे. आपले ज्ञान इतरांच्या उपयोगी पडले, तरच माणसाची ओळख निर्माण होते. समाजाचे आपण देणं लागत असून, त्यांना देणं परत करताना जीवनच सार्थक वाटत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)