डॉ. रमण बालवैज्ञानिक परिक्षेत सेंट झेवियर्सच्या विद्यार्थ्यांचे यश

श्रीरामपूर – नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परिक्षेत सेंट झेवियर्सच्या बालवैज्ञानिकांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले. यामध्ये मानसी किशोर कंत्रोड हीने इ.8 वीमधून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. तालुकास्तरावर साक्षी सचिन कोठारी हिने चौथा तर सिध्दी उज्ज्वल धुमाळ हीने तालुक्‍यात सहावा क्रमांक पटकाविला. इ. 9 वी. मधील अंकिता हिने तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला तर राहुल शंकर केवलरमाणी व पूर्वा युवराज गलांडे यांनी तालुक्‍यात अनुक्रमे चौथा व सहावा क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे 6 वीचे विद्यार्थी कृष्णा विकास अगरवाल, समर्थ राजु भलदंड, ऋतुजा सुभाष वाघमारे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे सहावा, सातवा व आठवा क्रमांक तालुकास्तरावर मिळवला. विद्यार्थींना शाळेचे प्राचार्य मा. फा. मारीयो फर्नांडीस, भूषण चांदेकर व गुरुबच्चन बत्रा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सेंट झेवियर्स स्कुलचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी व पालकांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)