डॉ. मिलिंद काकडे आज झी मराठी वाहिनीवर

लोणंद, दि. 9 (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रात व आयुर्वेद क्षेत्रात नावाजलेले लोणंद फलटण रस्त्यावरील आयुर्वेद सिटी या हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्‍टर मिलिंद काकडे (पाटील) व ज्योती काकडे (पाटील) हे शुक्रवार दि 10 सप्टेंबर रोजी 3 ते 3:30 यावेळात झी टिव्हीवर “आयुर्वेद सिटी मंत्रा’ या कार्यक्रमात “मणक्‍याचे विकार व संधीवात’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरेही देणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. मिलिंद काकडे (पाटील) हे मणक्‍याच्या विकारातील मानदुखी, पाठदुखी, ऍक्‍सिडेंटमुळे आलेले अपंगत्व, मणक्‍यातील झीज, स्लीपडीस्क, बांबू स्पाईन, मणक्‍यात गॅप पडणे इत्यादी तसेच संधीवात, आमवात, वातरक्त, अस्थीगत वात, इ. व्याधींची कारणे व लक्षणे व यशस्वी उपचार यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच मणक्‍याचे व गुडघ्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी कशा प्रकारे आयुर्वेद सिटीमध्ये संशोधित उपचार केले जातात हे पण सांगणार आहेत. योग्य निदान व लवकर उपचार यामुळे मणक्‍याची व गुडघ्याची ऑपरेशन टळू शकतात. डॉ. मिलिंद व ज्योती काकडे पाटील हे गेली वीस वर्षे आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून गेली दहा वर्षे “आयुर्वेद सिटी’ च्या माध्यमातून त्यांनी सुमारे 1000 च्या वर मणक्‍यांची व 800 च्या वर गुडघ्यांची ऑपरेशन टळली आहेत. या कार्यक्रमाचा लाभ मानदुखी, पाठदुखी, अपघाताने आलेले अपंगत्व, मणक्‍याची झीज, स्लीपडीस्क, बांबू स्पाईन, मणक्‍यात गॅप पडणे इत्यादी तसेच संधीवात, आमवात, वातरक्त, अस्थीगत वात इ. रूग्णांनी व आयुर्वेद प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयुर्वेद सिटीतर्फे करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)